
वीर(प्रतिनिधी) बीड तालुक्यातील बोरखेड येथील रहिवाशी इस्माईल सत्तार तांबोळी याचा खून लिंबागणेश जवळील, महाजनवाडी शिवारातील एका हॉटेलच्या मागे मृतदेह शेतामध्ये टाकण्यात आला होता.दिवसा ढवळ्या खून झाल्याने एकच खळबळ उडाली होती त्याप्रकरणी नेकनुर पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला होता.पैशाच्या वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून बीड गुन्हे शाखेने 24 तासाच्या आत आरोपी शिवाजी पवार,बाबू काळे व उमेश पवार या तिन आरोपींना नगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली.यातील शिवाजी पवार ला कालच पोलिसांनी ताब्यात घेतले होते.ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नसीर शेख,राजू पठाण,अतुल हराळे यांनी करून आरोपींना नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले पुढील तपास पोलीस निरीक्षक गोसावी करत आहेत.