परळीत हैवानी कृत्य,पाच वर्षाच्या बालिकेवर रेल्वे स्थानकात बलात्कार.
नराधम पोलिसांच्या ताब्यात.

बीडदि. ३१ (प्रतिनिधी):सहा वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन कामाच्या शोधात रेल्वेने परळीत आलेल्या कुटुंबाला एका धक्कादायक घटनेला सामोरे जावे लागले. दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी रेल्वे स्थानकात आई-वडिलांसोबत थांबलेल्या पाच वर्षाच्या बालिकेला उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. या हैवानी कृत्याने सर्वत्र खळबळउडाली आहे.
याबाबत प्राप्त प्राथमिक माहिती अशी की, पंढरपूर येथील एक जोडपे आपल्या लहानग्या पाच वर्षीय मुलीला घेऊन कामाच्या शोधात परळीला रेल्वेने आले. सकाळच्या सुमारास रेल्वे परळी वैजनाथस्थानकावर आली. या ठिकाणी हे पती-पत्नी आपल्या मुलीसह उतरले. यातील पीडित बालिकेची आई दोन-तीन दिवसापासून आजारी आहे. त्यामुळेरेल्वे स्थानकावरच थोडा वेळ आराम करून आपण बाहेर जाऊ असा विचार करून ती आपल्या मुलीला कुशीत घेऊन त्याच ठिकाणी झोपली. पिडित मुलीचे वडील स्थानकातच थोडेसे बाजूला गेलेले होते. दरम्यान तेवढ्या काही वेळात या मुलीच्या आईला झोप लागली व मुलगी तिच्या अवतीभवतीच चकरा मारत होती. याच दरम्यान एकटी मुलगी बघून अज्ञात हैवानी वृत्तीच्या व्यक्तीने तिला त्या ठिकाणाहून नेले व गैकृत्य केले. पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार करून हा अज्ञात हैवान तिथून निघून गेला. ही मुलगी रडत तिच्या आईकडे आल्यानंतर तिच्या आईने काय झाले याचा शोध घेतला असता तिच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव बघून तिच्यावर गैरप्रकार झाल्याचे तिच्या लक्षात आले. या पीडित बालिकेला परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, या बालिकेवर रेल्वे स्थानकातील दादऱ्याखाली नेउन कुणीतरी अज्ञात हैवान वृत्तीच्या व्यक्तीने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत गैरकृत्य झाल्याचे आढळले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वरीष्ठांना माहिती दिली. त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले. सहाय्यक पोलीस अधीक्षक, पोलीस स्टेशन संभाजीनगर, स्था.गु.शा. यांनी घटना घडल्यानंतर सर्व तांत्रीक बाबी तपासून पाच तासांच्या आत आरोपी निष्पन्न करुन आरोपीस तात्काळ अटक केली आहे.