बीड जिल्हा उद्योग केंद्रात पुन्हा 54 लाखाचा घोटाळा
बँकेचा युजर नेम,पासवर्ड वापरून केला अपहार,गुन्हा दाखल

वीर(प्रतिनिधी) बेरोजगारांना उद्योग करण्यासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र मार्फत विविध योजना राबवल्या जात आहेत.परंतु याचाच काही लोक गैरफायदा घेत असल्याचे उघड झाले आहे.जिल्हा उद्योग केंद्रमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबवली जाते, जिल्हा उद्योग केंद्र पात्र उमेदवारला कर्जाचे शिफारस करते.चार दिवसांपूर्वी अडिज कोटीचा घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर सात जनावर गुन्हा नोंद केल्याची घटना ताजी असतानाच आणखी 54 लाख रुपयाचा घोटाळा करायचा समोर आल्याने दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आनंदवाडी येथील SBI बँक व्यवस्थापकाने सायबरला दिलेल्या तक्रारीवरून रोहित अर्जुन मडके 30 लाखाचा अपहार तर ॲक्सिस बँकेचे स्वप्निल भिवरे यांच्या तक्रारीवरून नाना महादेव माने याच्या विरोधात 24 लाख 37 हजार 500 रुपयाचा आभार केल्याची तक्रार दिली आहे.पुढील तपास सायबर पोलीस अधिकारी करत आहेत.