बीडमध्ये 500 च्या बनावट नोटा ATM मशीन मध्ये भरल्या.
सीसीटीव्ही फुटेज व बँक खात्यावरून घेतला शोध लागला,गुन्हा दाखल.

एचडीएफसी बँकेच्या कॅश डिपॉझिटमशीनमध्ये (सीडीएम) ५०० रुपयांच्या सातबनावट नोटा टाकल्याचा प्रकार समोरआला. या प्रकरणी बँकेच्या रोखपालानेदिलेल्या तक्रारीवरून एका तरुणाविरोधातगुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील बार्शी रोडवरील बाजीराव कॉम्प्लेक्स येथेएचडीएफसी बँकेची शाखा आहे.दिनांक ३०ऑगस्ट रोजी बँकेचे रोखपाल नकुल घुंगरड कर्मचारी विकास बोरवडे हे तपासणीसाठी गेले होते. मशीनचा पैसे जमा करण्यात आलेल्या यूआरजेबी बॉक्स उघडल्यानंतर त्यांना त्या मधून बॉक्स मध्ये पाचशे रुपयांच्या सात बनावट नोटा आढळून आल्या. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एक व्यक्ती त्यांना बनावट नाेटा टाकताना दिसून आला. या व्यक्तीच्याबँक खात्याची माहिती काढल्यानंतर त्याचेनाव वैभव आगाम (रा. पिंपरगव्हाण, ता.बीड) असल्याचे समोर आले. या प्रकरणीनकुल घुंगरड यांच्या तक्रारीवरून वैभवआगाम विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.त्या तरुणाकडे बनावट नोटा कुठून आल्या?याचा तपास पोलिस करत आहेत.