बार्शी नाक्याजवळ दुचाकीची समोरासमोर धडक,दुचाकीस्वार गंभीर जखमी.
बांधकाम विभाग,साकेत कंट्रक्शनचा गलथान कारभार,भोपळे साहेब आणखी किती बळी घेणार?

https://youtube.com/shorts/3B3arMPProA?si=Nv3-2RKFv84ibHrf
बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बार्शी नाका तेलगाव नाका चौक रस्त्याचे काम संत गतीने सुरू असल्याने या रस्त्यावर रोजच अपघात होत आहे.
दोन दिवसापूर्वीच रात्री याच ठिकाणी एका व्यक्तीस चार चाकी मालवाहू वाहनाने उडवल्याने जागीच मृत्यू झाला होता, तर दहा दिवसांपूर्वी दुचाकीवर जाणाऱ्या इसमास क्रेन ने धडक दिल्याने दुचाकी सोबत जागीच ठार झाले होते, एक महिन्यापूर्वी तेलगाव नाका चौका मध्ये टेम्पो ने एका तरुणास उडवल्याने तरुण जागीच ठार झाला होता. अपघाताची मालिका दररोज सुरूच असून याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्यानेच व वाहतूक एका बाजूने सुरू असल्याचेच अपघात होत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे.
साकेत कंट्रक्शन व बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे पुन्हा एकदा गंभीर अपघात घडला आहे. सोमवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
. बार्शी रोडवरील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे,अर्धवट सिमेंट काँक्रीट, वाहतुकीसाठी कोणतेही सूचना फलक किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.तसेच वाहतूक एकाच बाजूने सुरू असल्याने वारंवार अपघात घडत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. नागरिकांनी तातडीने जखमीं रुग्णालयात दाखल केले. यावेळी नागरिकांनी बांधकाम विभागाविरोधात संताप व्यक्त केला. “कामाच्या नावाखाली जीव धोक्यात घालणारे रस्ते देणे म्हणजे जनतेशी केलेला थेट विश्वासघात आहे,” असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.
नागरिकांचे म्हणणे आहे की, काम वेळेत पूर्ण होत नाही, तसेच कोणतीही सुरक्षा खबरदारी घेतली जात नाही. वारंवार अपघात होऊनही बांधकाम विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित वाहतुकीसाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. अपघातात जखमी झालेल्याची नावे अद्याप समजू शकली नसून लवकर सविस्तर वृत्त देण्यात येईल.