ताज्या घडामोडी
व्हाट्सअप हॅक करून एक लाख 17 हजार गायब कले
लिंक ओपन करताच पैसे गायब,ऑनलाइनच्या फसवणुकीत वाढ

वीर(प्रतिनिधी) सध्याचे युग हे डिजिटल युग झाल्याने काही लोक वेगवेगळे व्हाट्सअप ग्रुप मधील लिंक पाठवून त्या लिंक वर क्लिक करताच बँक खात्यातील लाखो रुपये गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.सोशल मीडियावर सध्य पी.एम.किसान योजना,आयुष्यमान भारत योजना, कृषी योजना तसेच विविध शासकीय योजनेची जाहिरात चालू असून याचाच गैरफायदा घेत काही भामटे बनावट लिंक तयार करून व्हाट्सअप ग्रुप वर शेअर केले जाते ती लिंक ओपन करताच काही जणांचे बँक खाते रिकामे होत असल्याचे निदर्शनास आले असून यामुळे नागरिक व व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.