ताज्या घडामोडी
लाडकी बहिण योजेनेचा फॉर्म भरणाऱ्यांकडून महीलाची लूट
प्रति फॉर्म 100 घेऊन नंतर आणखी पैसे लागतील असे सांगण्यात येते

मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी लाडकी माझी बहीण ही योजना सुरू केल्याने तसेच या योजने करिता लागणाऱ्या कागतपत्राची जाचक अट रद्द केल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.मात्र काही सेतू सुविधा केंद्र चालक महिलांकडून पैशाचे लूट करत असल्याचा प्रकार समोर येत आहेत.प्रत्येक मुलीकडून ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यासाठी 100 रुपयाची मागणी करत आहे,फॉर्म सबमिट झाल्यानंतर आणखी पैसे द्यावे लागतील असे देखील सांगण्यात येत आहे.ग्रामीण भागातील महिलांसाठी आता अंगणवाडी सेविकाकडे सुद्धा अर्ज भरता येणार आहे.कागदपत्राची पूर्तता करतो म्हणून पैसे मागितल्याने सोलापूर मध्ये आज गुन्हा दाखल झाला आहे.बीड मध्ये देखील बरेच सेतू सुविधा केंद चालक पैसे घेत असल्याचं प्रकार समोर येत आहेत.