बीड बायपास रस्त्यावर अपघातात तीन ठार,दहा गंभीर
विचित्र अपघातात तीन जागेवरच ठार झाल्याची माहिती

वीर(प्रतिनिधी)बीड सोलापूर महामार्ग बीड बायपास संभाजी राजे चौकाच्या जवळ असलेल्या गतिरोधकवर सायंकाळी 6:30 वाजता अपघात झाला असून हा अपघातात एवढा मोठा होता की,जखमींना मदत करण्यासाठी मदतकार्य कमी पडले.आयशर टेम्पो मांजरसुंबा कडून औरंगाबाद कडे जात असताना बीड बायपास चौकात आल्यावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो ने मालवाहू छोटा हत्ती,चारचाकी,गॅस एजन्सीची रिक्षा,तीन मोटरसायकल लां धडक दिल्याने या विचित्र अपघातात ज्योोतीराम तांदळे, बबन बहिरमल, अशोक बहिरवाळ हे तीन जण जागेवर ठार झाले असून दहा ते बारा जन गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती मिळत असून,जखमीना शासकीय रुग्णात उपचारसाठी दाखल करण्यात आले.या अपघातात मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळतात ग्रामीण पोलीस ठाण्याचेे पोलीस निरीक्षक बंटेवार, पोलीस कर्मचारी आनंद मस्के जखमींना उपचारासाठी नेण्यास मदत केली व या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.