
वीर (प्रतिनिधी) किल्ले रायगडावर इतिहासात प्रथमच ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने रायगड किल्ल्यावर पर्यटक अडकून पडले होते.रायगड जिल्ह्यात नद्या नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत.राज्यातून शिवभक्त रायगड किल्ल्यांवर जात असतात त्यांना देखील या मुसळधार पावसामुळे जीव मुठीत धरून एकमेकांचा सहारा घेत होते.प्रथमच रायगडाच्या पायऱ्याला धबधब्याचे स्वरूप पाहायला मिळाले.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणू.किल्ले रायगडावरील पर्यटनासाठी बंद करण्यात आले असून रोप वे देखील बंद करण्यात आले आहे.आज पासून पर्यटकांसाठी रायगड किल्ल्यावर जाण्यास बंदी करण्यात आली आहे.पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तरी पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांनी पावसाची खबरदारी घ्यावी.