
वीर(प्रतिनिधी) आष्टी तालुक्यामध्ये बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवार दुपारपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली होती. त्यामुळे नदी नाल्या वाहत होत्या.चोही बाजूने पाणीच पाणी दिसून येत होते.अहमदनगर बीड महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने कडा या गावाला जाण्यासाठी पर्यायी पूल कडी नदीवर तात्पुरता करण्यात आला होता. कालच्या दमदार पावसाने हा पुल(नळ्या)वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली असल्याने वाहनांचा, प्रवाशाचा खोंळंबा झाला आहे. असेच चित्र बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पहावयास मिळत असून पावसाळापूर्वी पुलाचे काम होणे आवश्यक होते परंतु गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे पुलाचे काम संथ गतीने चालू आहे.कर्नाटक,तुळजापूर,लातूर,बीड, धाराशिव परभणी नांदेड या सर्व वाहतूक बंद असल्याने पर्यायी वाहतूक आष्टी वरून मिरजगाव मार्गे तर आष्टी वरून डोणगाव धामणगाव मार्गे वळवण्यात आली आहे.