
वीर( प्रतिनिधी)बीड.काही शासकीय कर्मचारी,अधिकरी सर्वसामान्य कडून पैसे घेतल्या शिवाय कामच करत नाही त्याचा प्रत्यय बीड जिल्ह्यामध्ये अनेक शासकीय कार्यालयामध्ये पहावयास मिळतो.सर्वसामान्य कडून पैसे लूट होत असताना काही नागरिक निमुटपणे पैसे देतात तर काही तक्रार देऊन कर्मचाऱवर, अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास भाग पाडतात.गेल्याच महिन्यामध्ये बीड स्थानिक गुन्हे शाखेचे हरिभाऊ खाडे यांनी लाच मागितल्याने कारवाई झाली होती.ही घटना ताजी असतानाच अंबाजोगाई येथील तात्कालीन कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांनच्यावर विरोधात कारवाई झाल्याने त्यांनी अवैधरित्या कमवलेली तीन कोटी दोन लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली.सध्या हे कार्यकारी अभियंता विकास विभाग अंधेरी येथे कार्यरत होते.त्याप्रकरणी कोकणे सह त्यांच्या पत्नीवर हे गुन्हा नोंद झाला आहे. कोकने यांना मुंबईतून अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपआधीक्षक शंकर शिंदे यांनी केली.