
वीर( प्रतिनिधी) बुधवारी पहाटेच भूकंपाचे धक्के जाणवले असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले.प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 7वाजून 15 मिनिटांनी नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले असून ४.२ रिश्टल स्केलवर नोंद झाली आहे. या भूकंपाच्या हादऱ्याने जीवितहनी झाली नसून नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.मराठवाड्यासह विदर्भातील वाशिम मध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. जमीनदारल्याने अचानक धरणी कम्प्युटर झाल्याने घरातील भांड्यांची पडझड झाली.हिंगोली शहरात सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याचे चित्र कैद झाले आहे.या आद्र्याने नागरिक भयभीत होवून घराच्या बाहेर आले.बीड शहरात सकाळी 8वाजून 17 मिनिटानी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे माहिती मिळत असून बीड तहसीलदार सुहास हजारे यांना विचारणा केली असता भूकंपाचे अधिकृत नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.