बीडमध्ये चोरट्याचा धुमाकूळ
पोलिसांनी रात्रीची ग्रस्त वाढवावी,गल्लोगल्ली तरुणांचा खडा पहारा

वीर(प्रतिनिधी) बीड शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून चोरट्यांनी अक्षरशःधुमाकूळ घातला असून नागरिकात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. बीड शहरामध्ये चोरांचे 8ते10 जणांचे टोळी फिरत असल्याचे बोलले जात आहे.शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील अंकुश नगर,कालिका नगर,धानोर रोड,दिलीप नगर,मित्र नगर,शिवाजीनगर,अंबिका चौक या भागात बरेच सीसीटीव्ही कॅमेरे चोर कैद झाल्याने बीड मधील नगरसेवकांनी,सामाजिक कार्यकर्त्यांनी दोन दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाणे प्रमुखाला निवेदन देऊन चोराचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती.तसेच पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील एकता नगर, शास्त्रीनगर माऊली नगर शास्त्रीनगर माऊली नगर,बार्शी नाका भागात चोर दिसल्याने काल काही महिलांनी पदाधिकाऱ्यांनी बीड बीड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोदीराज यांना निवेदन देऊन चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली.रात्री बीड शहरातील भगवान बाबा प्रतिष्ठान येथे एका घरासमोर चोर दिसल्याने भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्रीची ग्रस्त वाढवावी व चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी बीड शहरातील नागरीक करत आहेत.बीडच्या शहरात,गल्लीत तरुण रात्रभर जागून कडा पहारा देत आहेत.चोर पोलिसांचा हा खेळ किती दिवस चालणार म्हणून शहरातील युवक बीड पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असून चोरांच्या तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी करणार आहेत.