म.न.से.ने केले जागरण गोंधळ आंदोलन
कार्यकारी अभियंता सगर व राजकमल कंट्रक्शन ची चौकशीची मागणी

वीर(प्रतिनिधी) बीड कार्यकारी अभियंता सगर यांनी राजकमल कंट्रक्शन ला हाताशी धरून महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास यंत्रणा यांच्यामार्फत बीड जिल्ह्यात झालेल्या कामात बोगसगिरी केली आहे.या कामाची चौकशी करून राजकमल कंट्रक्शनला काळे यादीत टाकण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय समोर जागरण गोंधळ आंदोलन केले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या नावाखाली बोगस कामे झाल्याची याची तक्रार कार्यकारी अभियंता सगर यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. तक्रारीची दखल न घेतल्यामुळे आज कार्यालय समोरच मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, सहकार सेना अध्यक्ष अशोक सुरवसे, शहराध्यक्ष करण लोंढे, जिल्हा सचिव सोमेश कदम, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आशाताई कुटे,अनिता घुले यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते या जागरण गोंधळ आंदोलनात उपस्थित होते.