ताज्या घडामोडी

“शरिरसुखाची”मागणी करणाऱ्या न.प.कर्मचाऱ्याचे निलंबन करा

न.प.इंजिनीयर विरोधात आंदोलन करणार..अविनाश जोगदंड

वीर(प्रतिनिधी)बीड नगरपालिका सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते.नगर परिषदेमध्ये घरकुल मंजूर झाल्यावर प्रत्येक चेकसाठी हा इंजिनीयर बिनधास्त पैसे आपल्या खाजगी ऑफिसमध्ये मागतो अश्या अनेक तक्रारी येत होत्या परंतु वरिष्ठ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते.गरिबांना हक्काचे घर मिळावे म्हणून रमाई आवास योजने अंतर्गत अर्ज मागविले जातात,अर्जाची छाननी करून हे अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे पाठवला जाते.अनेक वर्षापासून नगरपरिषदेमध्ये एक इंजिनियर खुर्चीला चिटकुन बसला आहे.प्रत्येक लाभार्थ्याची तो पिळवणूक करतो पैसे दिल्या शिवाय फाईल पुढे सरकतच नाही.एका महिलेला घरकुल मंजूर झाले त्यामुळे आता “आम्हला खुष कर” अशी शरीरसुखाची मागणी या इंजिनियर ने केली.हे प्रकरण पोलीस ठाण्यात जाणार असल्याची समजतात न.प.मुख्यधिकारी यांनी कर्मचाऱ्यांची उचल बांगडी करत त्यांच्याकडून घरकुल चार्ज काढून घेत बदली केली.घरकुल विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे,परंतु जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रि.पा.ई.चे शहराध्यक्ष अविनाश जोगदंड यांनी केला आहे.ही बाब रिपाई पदाधिकाऱ्यांना समजताच आक्रमक भूमिका घेत त्या कर्मचाऱ्याची चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे.त्या कर्मचाऱ्यावर कारवाई नाही केली तरी पण आंदोलन करण्याचा इशारा अविनाश जोगदंड यांनी दिला आहे.यावेळी अक्षय कोकाटे,भैय्यासाहेब साळवे,आप्पा मिसळे, सनी जोगदड, बबलू जोगदंड, रितेश गायकवाड प्रभाकर चांदणे, ललित जाधव सह रि.पा.ई.चे कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन त्या दोघांची चौकशी करून बडतर्फ करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button