ताज्या घडामोडी
पेठ बीड भागातून पहाटे बुलेट चोरी.घटना CCTV कैद
शहरातील वाढत्या चोऱ्यामुळे पोलिसांपुढे आवाहन

वीर(प्रतिनिधी)बीड शहरात चोरीचे प्रमाणात वाढ झाली असून सध्या शहरातील विविध भागात चोरांनी धुमाकुळ घातला आहे.दोन दिवसापूर्वी पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील चोरांचा बंदोबस्त करावा म्हणून महिला पदअधिकारी यांनी ठाणे प्रमुखांना निवेदन दिले होते.आज पहाटे पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील तेलगल्ली भागातील माझी नगरसेवक यांनच्या घरासामोरं लावलेली बुलेट अज्ञात चोरट्याने घेऊन जातानाचा घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली असून बुलेट क्रमांक MH 23 AK 9600 दिनांक 10 जुलै रोजी पहाटे चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली या घटनेमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्रीची ग्रस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.