
मी मारल्या सारखे करतो,तू रडल्या सारखे कर सरकार व मावीआ ची भूमिका – जरांगे
ठरलेल्या 4 शब्दाप्रमाणे सरकारने आमच्या मागण्या पूर्ण करा, सरकारने जर फसवलं तर पुन्हा लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते बीडमधील शांतता रॅलीत समाजबांधवांशी संवाद साधत होते. यावेळी जरांगे यांनी छगन भुजबळ, गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले. तर मविआ व महायुतीच्या नेत्यांवरही निशाणा साधला.मनोज जरांगे म्हणाले की, आमचं हक्काचं आरक्षण द्या, काय व्हायचे ते होऊ द्या. या ठिकाणी जमलेली गर्दी ही स्वतःच्या मुलाच्या न्यायहक्कासाठी आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही, छगन भुजबळांच्या माध्यमातून सगळे ओबीसी नेते एक करण्याचे काम सुरू आहे. हे सर्व सरकारचा पाठिंबा आहे. भुजबळांच्या दहा पिढ्या आल्या तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देणार असेही जरांगे म्हणाले.जरांगे म्हणाले की, सरकारने मराठ्यांना जातीवादी ठरवले, पण मराठा समाज पवित्र आहे, कधीही जातीवादी नव्हता, पण काही ओबीसी नेते टिका करू लागले आहेत. तर आमच्यातील काही लोक आंदोलन फोडण्याचे काम करतात, माझ्या मराठ्यांना डाग का लावता, निवडणूकीत मराठ्यांचे मत घेईपर्यंत गोड लागले.सरकार कोणाचेच नसते मनोज जरांगे म्हणाले की, सगेसोयरेच्या अंमलबजावणीच्या बाबतीत हे काहीतरी बोलतील याची मला खात्री आहे. पण मी मराठ्यांसाठी मी माझे रक्त आटवायला तयार आहे. गिरीश महाजन मला माहित होते की, तुम्ही डाव टाकणार पण सरकार कोणाचेच नसते, मला माहितीआहे.मनोज जरांगे म्हणाले की,विदर्भातील मराठ्यांचा आणि शेतीवर कुणबी प्रमाणपत्र दिले. जर त्यातून काही लोक राहिले तर ज्या मराठ्यांची नोंद सापडेल त्या नोंदीच्या आधारावर राज्यातील मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याचे व्यवसाय आहे शेती आणि ज्या व्यक्तीची नोंद सापडली नाही तरी त्याचा व्यवसाय शेतीच आहे.म्हणून मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे,अशी मागणी केली. धनंजय मुंडेसाहेबांचे कॉलर टाईट झाली.कारण, हे महाशय बैठकीला बसलेले होते. ते म्हणाले की, हे तर सरसकटच झाले आहे. पण सरकारने दिलेला शब्द फिरवला तर पुन्हा लढायला तयार व्हा.मनोज जरांगे म्हणाले की,सरकारची राजकीय इच्छाशक्ती आहे, महाविकास आघाडीवाले नाही आले मग तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही का?,तुम्हाला द्यायचे नाही, मला तर संशय यायला आहे, हेदोन्ही एकच आहे. आमच्या हक्काचे आरक्षण, का पण यांनाएकमेकांना ढकलायचे आहे. तुमचा बाप झाला की आजा आणि तूमचा नातू निवडून द्यायचा. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो पण त्यांना सर्वसामान्य लोकांचा विचार करायचा नाही का, शिंदे, फडणवीस यांना देखील सांगतो की, मराठा समाजाच्या वेदना समजून घ्या, आत्महत्या केलेल्या आमच्या मराठा युवकाच्या घरात जाऊन बघा, त्यांच्या घरात केवळ काळोख आणि काळोख दिसेल. बापाने आणि पोराने देखील आरक्षणासाठी आत्महत्या केली. कपाळाचे कुंकू पुसलेल्या आमच्या महिलेला विचार की, घरातील परिस्थिती किती वाईट आहे. उभा संसार काळोखात पडला आहे. जरा एकदाआत्महत्या केलेल्या मराठ्यांच्या लेकरांच्या डोळ्यातील अश्रु पुसा, मग तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहे. मरण काय असते, घरावर काय संकट येते हे आम्ही बघितले आहे. मराठ्यांची चेष्टा करु नका,