
वीर(प्रतिनिधी)बीड नगर पालिका ढिसाळ कारभार समोर आला असून,बीड शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे.शहराला काही भागात पंधरा ते वीस दिवसाला पिण्याचे पाणी मिळते त्यात ही हे पाणी नाली मिश्रित आल्याने नागरिकांनी संताप व्यत करत नगरपालिका कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.पिण्याचे पाणी महिन्यातून एकदाच येते त्यात देखील मोमिनपुरा भागातील सौदागर कॉलनीमध्ये नळाला चक्क नालीचे पाणी आल्याने याची तक्रार देऊन न.प. कर्मचारी यांना देऊन देखील यावर काहीच उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांचे जीवांची खेळणाऱ्या बीड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर मुख्यधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मोमिनपुरा भागातील नागरिक करत आहेत.