ताज्या घडामोडी

पूजा खेडकर यांच्याकडे ११० एकर जमीन, ‘हिरानंदानी’त ७ अलिशान फ्लॅट्स आणि १७ लाखांचे सोन्याचे घड्याळ!

 नॉन क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता या दोन प्रकारातून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून आयएएस म्हणून निवड केल्या गेलेल्या आणि चमकोगिरी तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अवाजवी मागण्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात पूजा खेडकर यांच्याबाबतीतधक्कादायक खुलासे होत आहेत. विशेष म्हणजे नॉन क्रिमिलेयरसाठी पालकांचे उत्पन्न आठ लाख रुपयांच्या खाली असणे अनिवार्य आहे. परंतु पूजा खेडकर व त्यांच्या आईवडिलांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावून चमकोगिरी करणाऱ्या पूजा खेडकर यांच्या नोकरीवरच गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परीविक्षीधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तणूक आणि अवाजवी मागण्यांमुळे चर्चेत आलेल्या हेत. त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या व्यक्तीची बदली होण्याची घटना दुर्मिळ मानली जाते.पूजा खेडकर यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगातून (यूपीएससी) झाली आहे. नॉन क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता या दोन प्रकारातून त्यांची निवड झाल्याचे सरकारच्या संकेतस्थळावरून दिसून येत आहे. नॉन क्रिमिलेयरसाठी पालकांचे उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी करणे अनिवार्य असते. परंतु आता पूजा खेडकर यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला आहे.

नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रावर आयएएसझालेल्या पूजा खेडकर यांच्या आईवडिलांकडे तब्बल ११० एकर शेतजमीन आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील जमीन कमाल शेतजमीन धारणा कायद्याचे उल्लंघन असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी

म्हटले आहे.पूजा खेडकर यांच्याकडे १.६ लाख चौरस फूट क्षेत्रफळाची ६ दुकाने, ‘हिरानंदानी’ मध्ये ७ अलिशान फ्लॅट्स आहेत. पूजा खेडकर यांच्याकडे ९०० ग्रॅम सोने-हिरे आणि १७ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे घड्याळही आहे. त्यांच्याकडे ४ कार, दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये भागीदारी तसेच एक ऑटोमोबाईल कंपनीही आहे. पूजा खेडकर यांच्याकडे तब्बल १७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तरीही त्या नॉन क्रिमिलेयर गटातून आयएएस कशा झाल्या, याची चौकशी व्हायला नको का?, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे.पूजा खेडकर या २०२२ च्या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. जून महिन्यात त्यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिणार्थी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. दिलीप खेडकर यांनी राज्याच्या प्रदूषण विभागाचे आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.

 

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button