महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन
महसूल कर्मचाऱ्याच्या विविध मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनात सहभाग

वीर (प्रतिनीधी) महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विधवा संदर्भात शासन स्तरावर कोणतेही कार्यवाही होत नसल्याने महसूल कर्मचारी यांनी लेखन बंद आंदोलन पुकारले.मागण्या 1)महसूल मध्ये 30%पदे रिक्त असल्याने एकच कर्मचाऱ्याकडे दोन,तीन संकलनाचा अतिरिक्त कारभार दिल्याने कामाचा बोजा वाढत असल्याने कर्मचारी मानसिक तसेच शारीरिक व्याधीन होत आहेत.2) अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नाहीतर सुदर या पदावर पदोन्नती देण्यात बाबत शासन स्तरावर अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.3) कर्मचाऱ्याचे वैद्यकीय देयक दोन तीन वर्षापासून मिळत नसल्याने कर्जाचे हप्त्याचा बोजा वाढत आहे.अश्या अनेक मागण्या मान्य व्हावे यासाठी महसूल कर्मचाऱ्यानी लेखनी बंद आंदोलन केल्याने कार्यालयात शैक्षणिक कागदपत्रे व कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागला व वाट पाहत बाहेर ताटकळत थांबावे लागले.