ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री”लाडकी माझी बहीण”या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी

महसूल विभागातील पदे मंजूर करून ही योजना कार्यान्वित करण्यात यावी.

वीर( प्रतिनिधी) महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासना कडून बचत गट,अर्थसहाय्य,गृह उद्योग अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत. नुकतीच राज्य सरकारने मुख्यमंत्री “लाडकी माझी बहिण”ही योजना सुरू करून स्तुत्य उपक्रम केला आहे. या निर्णयाने महाराष्ट्रातील महिलांत क्रांतिकारी बदल घडवून आणणे व महाराष्ट्र राज्य स्त्रियांच्या आदर,सन्मान व त्यांचे स्वातंत्र्याचे संवर्धन करण्यासाठी आग्रही राज्य असण्याचा मान आपल्या राज्याला मिळणार आहे.या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी समित्या स्थापन केल्या आहेत. यामध्ये जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी सचिव असून तलुका स्तरावर तहसीलदार हे सदस्य सचिव आहेत. या योजनेमध्ये लाभार्थ्याची संख्या खूप जास्त असल्याने कामाचा अतिरिक्त व्याप हा कर्मचाऱ्यावर पडत असून ही योजना कायमस्वरूपी असल्याने याची व्याप्ती वाळत जाणारी आहे. भोसरी मधील उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या बळावरी ही योजना सक्षमपणे अंमलबजावणी होऊ शकणार नाही, तसेच विधानसभा निवडणूक असल्याने कामाचा अतिरिक्त ताण हा कर्मचाऱ्यावर पडत असल्याने ही योजना सक्षमपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील एक तहसीलदार, दोन अव्वल कारकून,दोन महसूल सहाय्यक,एक उपलेखपाल ही पद मंजूर करून त्यांच्याकडून ही योजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे.म्हणून महसूल कर्मचारी हे काम ना करत आहेत.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button