पंकजा मुंडेचा राजकीय वनवास संपला,विधान परिषदेवर विजयी
महाराष्ट्रसह बीड जिल्ह्याचे चित्र बदलणार

वीर(प्रतिनिधी) दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा विधानसभेत पराभव झाल्यावर त्यांनी राजकारणापासून थोडे लांब जात थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यावर निशाणा करणे त्यांना चांगलेच महागात पडले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी पंकजा मुंडे यांचा जातीपातीच्या राजकारणात निसटता पराभव झाला होता. त्यामुळे पंकजा मुंडे अधिकच अस्वस्थ झाल्या होत्या.त्यामुळे पंकजा मुंडे चे राजकीय अस्तित्व संपते की काय असा प्रश्न ओबीसी समाजाला पडला होता.पंकजा मुंडे यांचा पराभव मराठा आरक्षणामुळे झाला ओबीसी नेत्यात कार्यकर्त्यात व विशेष बीड जिल्ह्यातील वंजारी समाजात सरकार विषयी चीड निर्माण झाली होती.पंकजा मुंडे यांना ओबीसीच्या नेत्या म्हणून अवघा महाराष्ट्र पाहतो त्यामुळे पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्याने भाजप नेत्यात व कार्यकर्त्यात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.पंकजा मुंडे यांना विधान परिषद घेतल्याने महाराष्ट्रासह बीड जिल्ह्याचे चित्र नक्कीच बदलणार यात शंका नाही.