परळी चे फड शरद पवाराच्या संपर्कात.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढली,फड यांनी जयंत पाटलांची भेट घेतली

वीर(प्रतिनिधी) महाराष्ट्राचे राजकारणामध्ये सध्या काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही.विधानसभा निवडणुकी काही महिन्यावर आल्याने परळी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.पंकजा मुंडे यांच्या विश्वासू व जवळचे असलेले राजेभाऊ फड यांनी शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होत असून जयंत पाटील यांची गुरवारी भेट घेतल्याने परळी च्या राजकारणात बदल होणार हे निश्चित झाले असून फड यांनी परळी विधानसभा लढण्याची संकेत दिले आहेत.बबन गीते ते परळी विधानसभेचे उमेदवार म्हणून जवळजवळ निश्चित झाले होते, परंतु बबन गीते यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाल्याने ते सध्या फरार आहेत.राजेभाऊ फड पवार भेटीने धनंजय मुंडे यांना परळी विधानसभा सोपी वाटणारी निवडणूक निश्चित डोकेदुखी ठरणारी आहे.येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे आणि राजेभाऊ फड यांच्यात लढत झाली तर बहिण पंकजा मुंडे यांची भूमिका निर्णयाक ठरणार असून बीड जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष परळी विधानसभा निवडणूक व निकालाकडे लागणार आहे.