
वीर(प्रतिनिधी) बीड शहरातील धानोर रोड भागातील आशा टॉकीज जवळील नाली मध्ये नवजात शिशु आढळल्याने नागरिकांनी याची माहिती पोलिसाला दिली असून घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल झाले असून हे नवजात शिशु कोणी व का फेकले याचा शोध घेत आहेत. बीड शहरांमधील पंधरा दिवसातील ही दुसरी घटना असून भाजी मंडई येथे गजबजलेल्या ठिकाणी असेच नवजात शिशू अज्ञातानी टाकले होते.अशा घटनांमध्ये वाढ होत असून पोलीस व आरोग्य विभागाने याची सखोल चौकशी करून यावर कठोर कारवाई करण्यात यावी.तरच अशा घटनांना आळा बसेल