
वीर (प्रतिनिधी) महाराष्ट्र मध्ये गुटखा बंद असताना देखील बीड जिल्ह्यात मात्र सर्रास पान टपरी,किराणा दुकान,हॉटेल्स खुलेआम गुटखा विक्री होताना दिसते.माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दी तेलगाव वरून परळी कडे जाणाऱ्या कंटेनर मध्ये गुटखा असल्याची गुप्त माहिती मिळाली असता.बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाच वाजेच्या सुमारास दिंद्रुड जवळील भोपा गावाजवळ कंटेनर पकडला असता त्यामध्ये तब्बल एक कोटीच्या वर गुटखा आढळून आला. या पथकाने कंटेनर ची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये 75 लाख रुपय किमतीचा पान मसाला गुटखा व कंटेनर ची अंदाजी किंमत 25 लाख रुपये असे एकूण मिळून एक कोटीच्या वर मुद्देमाल जप्त करून दिंद्रुड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला पुढील कारवाई रात्री उशिरापर्यंत चालू होती.ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय तुपे, सुशांत सुतळे,पो.हे.कॉ.नसीर शेख,अशोक दुबाले,कैलास ठोबरे,राजू पठाण, मारुती कांबळे,अर्जुन याधव, वाहन चालक गणेश मराठे,अतुल हरळे यांनी कारवाई केली. कंटेनर चालक विद्या राम श्यामलाल उत्तर प्रदेश यास दिंदृड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.