संशयितरित्या फिरणाऱ्या महिलेला चोर समजून मारहाण
बीड शहरात चोऱ्यासह अफवांत वाढ,पोलिसांनी रात्रीची ग्रस्त वाढवावी

वीर (प्रतिनिधी) बीड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून चोऱ्यांच्या प्रमाणामध्ये वाढ होत असून,चोरांच्या भीतीने नागरिकांनी आप-आपल्या भागात रात्रीचे जागरण सुरू केले आहे. पोलिसांनी देखील रात्रीची ग्रस्त वाढविली असून तरीही दोन दिवसापूर्वी फुलाई नगर भागामध्ये चोरीचा प्रकार घडला आहे,यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शिवाजीनगर हद्दीतील शाहूनगर भागातील उमा किरण च्या बाजूला रात्री अकराच्या सुमारास एक महिला रस्त्याने फिरत असताना नागरिकांना त्या मुलीला विचारपूस केले असता, त्या महिलेने समाधानकारक उत्तर न दिल्याने स्थानिक नागरिकानी त्या महिलेला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले, परंतु त्या महिलेला मारहाण झाल्याची सांगितले,पोलिसांनी त्या अधिक चौकशी केली असता ती महिला वडवणी जवळी चिंचवन गावची असल्याची माहिती मिळाले असून ती महिला थोडी भोळसर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.पुढील तपास शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पठाण करीत आहेत.