
वीर(प्रतिनिधी) पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्याने महाराष्ट्रातील तसेच बीड मधील नेते व कार्यकर्ते यांना हा पराभव ज्वारी लागल्याने तिन कार्यकर्त्यांनी आपल आयुष्य संपवले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन. भाजपचे वरिष्ठ नेते तसेच ओबीसी समाजाने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी केली होती. पंकजा मुंडे कडे ओबीसी नेत्यां म्हणून अवघा महाराष्ट्र पाहतो.विधानपरिषद पंकजा मुंडे विजय झाल्याने बीड जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष व आनंदत्सव केला. माजलगाव मधील कार्यकर्त्यांनी बॅनर वर पंकजा मुंडे यांची भावी मुख्यमंत्री अशा प्रकारचे बॅनर लावल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क होत आहे की भाजपकडून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद मिळणार का?अशी चर्चा बीड जिल्ह्यात होत आहे.