मंत्री धनंजय मुंडे बद्द्ल अपशब्द वापरल्याने सायबर पोलिसात गुन्हा दाखल
जरांगे पाटील बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने गुन्हा दाखल

वीर(प्रतिनिधी) बीड लोकसभा निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणावर झाली असून, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य काहीनी केल्याने या आधी बरेच गुन्हे पोलिसात दाखल आहेत.पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने सुदाम गव्हाणे या व्यक्ती विरोधात सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला,तर मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समोर आला होता आक्षेपार्ह वक्तव्य करणारे प्रमोद वनवे,संदीप वनवे यांना अटक करावी यासाठी पाटोदा पोलीस ठाणे, नेकनुर पोलीस ठाण्यात मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.काही दिवसापासून दोन समाजात दरी वाढत गेल्याने एकमेकाबद्दल च्या नेत्याबद्दल व्हिडिओ व रिल्स काढून त्या सोशल मीडियावर टाकल्याने समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.