
वीर(प्रतिनिधी) बीडमध्ये लाखोंचा ऑनलाईन सट्टा मोबाईल ॲपद्वारे नागरिक लावत आहे,सायबर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की जालना रोड वरील रिलायन्स मॉल च्या पाठीमागे एक अपार्टमेंट मध्ये दुसऱ्या मजल्यावर एक इसम महादेव ॲपद्वारे फोन पे, गुगल पे, पेटीएम,भीम ॲप, नेट बँकिंग इत्यादी द्वारे ताब्यात असलेल्या विविध खात्यामध्ये ऑनलाईन रक्कम जमा करून ती रक्कम विविध खात्यामध्ये पाठवत असल्याची माहिती मिळाल्यावर त्या अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये छापा मारला असता एक इसम आला तो स्वतःच्या व इतरांच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर जुगार खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले.इसमाला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 5 मोबाईल,25 सिमकार्ड, विविध बँकेचे 67 पासबुक,100 चेकबुक,,150 एटीएम कार्ड जप्त करण्यात आले. सदर कामगिरीही बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी.बी.गात, पोलीस निरीक्षक शैलेश जोगदंड,पो.ना.विजय घोडके,पो.शी.अजय जाधव,पो.शी. प्रदीपकुमार वायभट सह सायबर टीमने केली. ऑनलाइन सट्टा,जुगार यावर पोलिसांची नजर असून नागरिकांनी कोणत्या आमिषाला बळी पडू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिला आहे.