ताज्या घडामोडी
पिंपळनेर परिसरात मुसळधार पाऊस,पूरसदृश्य परिस्थिती
पुलावरून पाणी गेल्याने गावचा संपर्क तुटला

बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले. गेल्या महिन्यात देखील असाच अचानक मुसळधार पाऊस पडल्याने दादा संपर्क तुटला होता,आज देखील जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत होते.यामुळे शेतकरी राजा खुष झाला असून,पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यामध्ये असणारी नदी ओसंडून वाहिल्याने,पुलावरून पाणी जात असल्याने गावचा संपर्क तुटला आहे.