
वीर (प्रतिनिधी) पावसाळ्याचे दिवस असल्याने सापाच्या बिळामध्ये पाणी गेल्याने, शेतात तसेच मानवी वस्ती ठिकाणी सुद्धा साप आढळून येतात.बीड तालुक्यातील मोची पिंपळगातील रहिवाशी इंदुबाई प्रकाश ससाणे वय 47 वर्षे ही महिला आपल्या शेतात कापूस पेरणीसाठी गेली असता अतिविषारी घोणस साप चावल्याने उपचारासाठी बीड जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता,उपचारा दरम्यान मृत्यू झाला.घोणस हा साप अतिविषारी असून थंडीच्या दिवसांमध्ये बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते.