
वीर(प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नसल्याचे पहिले आहे. मंत्री छगन भुजबळ हे काही दिवसापासून अजित पवार यांच्या पक्षात नाराज असल्याचे व एकटे पडल्याचे दिसून येत आहे. मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना टार्गेट केल्याने, भुजबळ हेच मराठा आरक्षण विरोधी असल्याचे दाखवून देत आहेत.त्यामुळे भुजबळ हे अस्वस्थ असल्याचे समजते.सकाळी भुजबळ हे शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्वर ओक बंगल्यावर गेले असता तब्बल दीड तास भुजबळ यांना वेटिंग करावी लागेल.दोन्ही नेत्या मध्ये मराठा,ओबीसी आरक्षणामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची चर्चा झाल्याचे बोलले जाते.परंतु या भेटी मागे छगन भुजबळ हे स्वग्रही परतणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे, परंतु छगन भुजबळ यांना पक्षात घेणार नाही असे शरद पवार हे स्पष्ट केले.उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील बरेच आमदार मंत्री भीतीच्या वातावरणामध्ये असल्याचे आणि देशमुख यांनी दावा केला आहे.