
वीर(प्रतिनिधी) धुळे सोलापूर महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे, चार दिवसापूर्वीचे एका कंटेनरने चार वाहनाला धडक दिल्याने तीन जागीच ठार झाले.आज सकाळी चौसाळा रस्त्यावरील आरोग्य केंद्र जवळ ट्रक ने समोरासमोर मोटरसायकल धडक दिली.हा अपघात एवढा भीषण होता की,ट्रकच्या धडकेत दुचाकीचे दोन तुकडे झाले व दुचाकीस्वार बाळासाहेब दिलीप भोसले रा.पाली तलावाजवळ मंजरी रोड लगत वस्ती हे कामानिमित्त जात असताना अपघातात जागीच ठार झाले.