बार्शी नाक्यावर चोरांची टोळी पकडल्याची शहरभर अफवा
अपघात करून पळून जाताना वाहतूक पोलिसांनी पकडले

वीर(प्रतिनिधी) बीड शहरामध्ये चोर दिसले,चोर आले असल्याच्या अफवांमुळे शहरातील नागरिक रात्र रात्र जागून काढत आहेत.आज दुपारी गेवराई कडून मजलगावकडे एक चारचाकी वाहन जात असताना MH 20EJ 2904 या वाहनाचा पुढील काच फुटलेला व खाली बंपर घासलेले दिसल्याने वाहतूक पोलिसांना ह्या वाहनाचां संशय आला की अपघात करून आले की काय म्हणून आल्याचा त्यांनी गाडी थांबण्याचा प्रयत्न केला असता वाहन सुसाट वेगाने बार्शी नाकाकडे निघाले असता हिना पेट्रोल पंप समोर वाहतूक पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून पकडले असता नागरिकांनी मोठ्या प्रमाणत गर्दी झाली त्यामुळे चोरांची टोळी पकडल्याचे अफवा शहरभर पसरली,त्या वाहनातील सहा लोक.होते त्यांना ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयातल स्थानिक गुन्हे शाखा च्या ताब्यात देण्यात आले.या वाहांनाची तपासणी करून त्यामध्ये काही आढळून आले नाही.यातील दोघे औरंगाबाद येथील व दोघे माजलगाव येथील असल्याची माहिती स्थानी गुन्हे शाखेला दिली. हे वाहन पाचोड येथे अपघात करून आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.वाहनातील 6 जनावर पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.