भाजप ला मतदान करणार नाही,ठेवीदारांनी शपथ घेतली
लाखो ठेवीदार अडचणीत,आत्महत्या करण्याची काहिवर वेळ

वीर(प्रतिनिधी)बीड शहरातील सुरेश कुटेनी सुरू केलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये लाखो नागरिकांनी, शेतकऱ्यांनी,डॉक्टर,व्यापाऱ्यांनी यात पैसा गुंतवला,ठेवी ठेवल्या होत्या.ठेवीदारांना वेळेवर व अडचणीच्या काळात पैसा न मिळाल्याने काही ठेवेदारांनी सुरेश कुटे,अर्चना कुटे,आशिष पटोदकर सह संचालक मंडळावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे.सुरेश कुटे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी चालू आहे.सुरेश कुटे यांनी वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ठेवीदारांना भावनिक करत, माझ्या आई-वडिलांच्या नावाने ज्ञानराधा मल्टीस्टेट आहे त्यामुळे मी कोणाला फसवणार नाही मी सर्वांचे पैसे देणार, माझा फंड विदेशातून येणार आहे असे खोटे आश्वासन दिले जात होते. त्यातच कुटे नी होणाऱ्या कारवाया,अटक थांबवण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.त्यामुळे ठेवीदार,शेतकरी, व्यापारी वर्ग, डॉक्टर चांगले संतापले असून जालना जिल्ह्यातील अंबड येथे उपोषण सुरू असताना त्यांची दखल कोणीच न घेतल्याने ठेवीदारांनी संतापून कुटे ना प्रवेश दिलेल्या भाजप नाराजी व्यक्त करत भाजप पक्षाला मतदान करणार नाही अशी सामुहिक शपथ घेतली. त्यामुळे येेत्या काळात विधानसभा तसेच विवध निवडणूकित ज्ञानराधाच्या ठेवीदाराच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे.