
येवले (प्रतिनिधी) बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने माजलगाव शहरातील नागरिकांची अचानक झालेल्या पावसाने तारांबळ उडाली 16 जुलै रोजी सायंकाळी माजलगाव शहरात दमदार पाऊस झाला.या पावसामुळे बजाज कॉम्प्लेक्स,नरवडे कॉम्प्लेक्स या भागातील नाल्याचे काम व उतार व्यवस्थित न दिल्याने दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे माजलगाव नगर पालिकेचा बोगस कारभार पुन्हा जनते समोर आला.माजलगाव नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी याकडे लक्ष घालून त्या गुत्तेदाराला नाल्याचे काम नाल्याचे काम उशीर करून द्यावे आदेश द्यावेत अशी मागणी व्यापारी करत आहेत.