सहा संशियताना पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले
चोरांच्या आफवेने बीड शहर हैराण.

वीर (प्रतिनिधी)बीड शहराला चोरांनी चागलीच दहशत केली असून चोराच्या भीतीने शहरातील नागरिक रात्र रात्र जागत आहेत.चोराच्या अफवेने तर बीड शहर हैराण झाले असून दररोज कुठे ना कुठे संशियत पकडले जात आहेत परंतु ते नागरिकांनी पकडलेले लोक हे चोर नसल्याचे चौकशीत निष्पन्न होत आहे.अशीच एक घटना आज बारा वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाणे हद्दीतील राजीव गांधी चौकात घडली असून चार संशयीतांना स्थानिक नागरिकांनी पकडून शिवाजीनगर पोलीसाच्या ताब्यात चौकशीसाठी दिले असता हे बाहेर राज्यातील(बिहारी)कामगार असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून ते एका बांधकाम गुत्तेदाराकडे कामाला आहेत,आज सकाळी ते खरेदीसाठी बाहेर आल्याचे सांगण्यात आले परंतु काही अफवा पसरल्याने त्यांनच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.नागरिकांनी अफवेला बळी पडू नये असे आवाहन बीड पोलीस अधीक्षक नंद कुमार ठाकुर यांनी केले आहे.