ताज्या घडामोडी
बीड स्थानिक गुन्हे शाखेची चक्रिवर कारवाई.
शहरात चौक-चौकात,गल्लीत चक्रिवर स्थानिक पोलिसांची दुर्लक्ष

वीर(प्रतिनिधी)बीड शहरात अवैधधंदे बोकाळले असून त्या भागातील ठाणे प्रमुखाकडून ठोस कारवाई होत नव्हती.चक्री जुगारात अनेक युवक,मजूर वर्ग,तसेच छोटे व्यायसाईक यात पैसे लावल्याने युवक कर्जबाजारी होत असल्याचे दिसत होते.शिवाजी नगर पोलीस ठाणे हद्दीतील पालवन चौकात बिंगोचक्री चालत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता छापा टाकून एल.सी.डी.,लॅपटॉप व रोख रक्कम मिळून 45200 रुपयेच मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे,हवालदार अशोक दुबाले,नासीर शेख,भागवत शेलार, नारायण कोरडे यांनी करून मुद्देमाल व आरोपी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला.