
वीर(प्रतिनिधी)राज्य सरकारने “लाडकी बहीण माझी”ही योजना नुकतीच जाहीर केल्याने महिलाना दरमहा 1500 रुपये मिळणार असे जाहीर करण्यात आले.मात्र ही योजना जाहीर केल्यावर लाडक्या भावाच काय?असा प्रश्न जोर धरू लागला होता.पंढरपूरला आषाढी एकादशी निम्मत मुख्यमंत्र्याच्या हस्ते पूजा करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना राबवणार असल्याचे सांगितले.12 वी पास विद्यार्थ्यांना दरमहा 6000 रुपये, डिप्लोमा झालेल्यांना दरमहा आठ हजार रुपये तर पदवीधर असणाऱ्यांना 10,000 देण्याचे जाहीर केले.कामाचा अनुभव असणाऱ्यांना नोकरीत संधी मिळेल,राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेंटिसशिप करतील त्याचा खर्च सरकार करेल असे देखील जाहीर केले.या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असायला हवे.बेरोजगार तरुणांना याचा लाभ मिळावा म्हणून सरकारने लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.या निर्णयाने बेरोजगार तरुणानी ऑनलाईन फॉर्म भरून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आले.