
वीर(प्रतिनिधी) बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या बाजूला भगवा ध्वज असावा अशी मागणी शिवप्रेमी अनेक दिवसापासून केली होती.त्यांच्या या मागणीला यश आले असून 110 फूट उंच व 20 बाय 30 भगवा ध्वज उभारणीच्या कामाला वेग आला असून आज संध्याकाळपर्यंत क्रेनच्या सहाय्याने ध्वज उभारला जाणारा आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उभारल्याने बीड च नाव महाराष्ट्रात गाजणार असून बीड जिल्ह्यातील सर्वात उंच भगवा ध्वज म्हणून याची नोंद होणार आसल्याने शिवप्रेमीनी आनंद व बीड नगरपालिका मुख्याधिकारी यांचे आभार व्यक्त केले.