
वीर(प्रतिनिधी)अजय बारस्कर हे आषाढी एकादशी निम्मित पंढरपूरला दर्शनासाठी गेले असता,17 जुलै रोजी दुपारी एका शेतात पार्किंग मध्ये लावलेली कार आज्ञाताने पेटवल्याची तक्रार पंढरपूर पोलिसात दिली असून दोन दिवसापासून धमक्या येत असल्याचे अजय बारस्कर यांनी सांगितले.मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांचे हे सहकारी होते,नंतर त्यांनी जरांगे यांची साथ सोडत त्यांच्यावर व आंदोलनावर टीका केल्या होत्या.तेव्हा पासूनच आपल्या धमक्या येत होत्या,त्यांनीच कार पेटवल्याचे बारस्कर यांनी पोलिसांना सांगितले. कार जळाली का जाळली याचा तपास पोलीस करत आहेत.