
वीर(प्रतिनिधी)बीड शहरात चोरीचे प्रमाणत वाढ झाली असून नागरिक रात्र रात्र जागून काढत आहेत.चोरीच्या घटनपेक्षा अफवाच जास्त पसरवल्या जात आहेत.जुने व्हिडीओ ग्रूपवर टाकल्याने नागरिकात भीतीचे वातावरण झाले आहे.गेल्याच महिन्यात बार्शी नाका भागात छत्रपती शाहू बँकेचे ATM मशीन पळवून नेण्याचा प्रयत्न फसला होता.त्यामुळे सतर्कता म्हणून पोलिसांनी एटीएम कडे ग्रस्त वाढवली होती.बीड शहरातील बार्शी रोड वरील शिवसेना कार्यालयाच्या बाजूला AXIS बँकेचे ATM असून रात्री 2 च्या सुमारास शिवाजी नगर पोलिसांनी एकाला अटक केले.अक्षय दिलीप गायकवाड रा.पेंडगाव हा रात्री दगडाने ATM मशीन फोडून कॅश कडण्याचाया प्रयत्नात असल्याचे पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांना दिसला त्याला ताब्यात घेऊन शिवाजी नगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले असता तो वेडसर असल्याचे माहिती समोर आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.एटीएम मधील कॅश सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.