
वीर (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये लाचखोरी प्रमाण वाढत असून कारवाईच्याही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.मागील महिन्यात जिल्ह्यातील क्लास वन अधिकाऱ्यावर देखील कारवाई झाल्या आहेत. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये पैसे घेतल्याशिवाय नागरिकांचे कामच होत नाही असे निष्पन्न झाले आहे. बीड तालुक्यातील मंजिरी फाटा,पाली तलावाजवळ एक क्षेत्र व्यवस्थेचे दुकान असून, त्याचे मीटर जळाल्याने नवीन मीटर बसवून देण्यात यावे यासाठी अर्ज केला होता, या भागातील जीवन मुंडे यांनी 20,000 रुपयेच मागणी केली होती,तडजोड करून 15 हजारात ठरल्यानंतर मांजरी फटल्यवर हॉटेल चालक सय्यद आयुब महम्मद याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी हॉटेल चालक व लाईनमन श्रीमंत मुंडे यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गोरा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, शंकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवड, सुरेश सांगळे अमोल खरसाडे,श्रीराम गिराम,गणेश मेहत्रे,गणेश निकाळजे यांनी कारवाई केल्याने लाचखोरीचे धाबे दनाणले आहेत.