ताज्या घडामोडी
“पिपाणी” चिन्ह गोठवले,शरद पवार गटाला दिलासा.
तुतारी आणि पिपाणी एकसारखे दिसत असल्याने मतदारात संभ्रम निर्माण झाला होता

वीर(प्रतिनिधी) शरद पवार यांना तुतारी वाजणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले होते.परंतु तू तरी आणि पिपाणी चिन्ह हे सारखेच दिसत असल्याने मतदारात संभ्रम झाल्याने शरद पवार लोकसभेत गटाला याचा चांगलाच फटका बसला होता.सातारा लोकसभा निवडणुकीत 37000 मते पिपाणी चिन्हाला पडल्याने शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता. शरदचंद्र पवार गटाने लोकसभेत 10 जागा लढवल्या होत्या,त्यामध्ये पिपाणी चिन्हाला चार लाखापेक्षा अधिक मते मिळाली होती.लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पिपाणी चिन्हाचा धोका होईल असे वाटल्याने शरद पवार गट निवडणूक आयोगाकडे पिपाणी चिन्ह गोठवावे,पिपाणी चिन्ह रद्द करावे अशी मागणी केली होती.यांची मागणी मान्य करत निवडणूक आयोगाने आज पिपाणी चिन्ह गोठवल्याने शरदचंद्र पवार गटाला दिलासा मिळाला आहे.