IAS पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
दिव्यांग प्रमाणपत्र,नाव,पत्ता,सही खोटी करून केली होती फसवणूक

वीर(प्रतिनिधी) केंद्रीय लोकसेवा आयोगाने(UPSC) नागरी सेवा परीक्षा सेवा 2022 च्या तात्पुरत्या शिफारस केलेल्या उमेदवारास कु.पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्यावर खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सह इतर बाबींची सखोल तपास केल असता तपासणी मध्ये असे आढळून आले की परीक्षा नियमानुसार परवानगी असलेल्या मर्यादाच्या पलीकडे तिचे नाव,आई,वडिलाचे चे नाव,फोटो, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर बदलून फसवणूक केल्याचे उघड झाल्याने पूजा खेडकवर पुढील परीक्षेस बंदी घालण्यात आली आहे.यामुळें पूजा खेडकर ह्या वादात सापडल्या असून त्यांच्यावर कारवाई होणार आहे.पूजा खेडकर यांच्या आईने शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धकामवल्याचा व्हिडिओ झाला होता, याप्रकरणी पूजा खेडकर च्या आईवर गुन्हा दाखल झाला असून या कुटुंबाल राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा होत आहे. खेडकर कुटुंबच वादात सापडले असून पूजा खेडकर वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.