
शंकर बापूराव सुगडे यांनी कामावरून काढण्याचा राग येऊन सुग्रीव हरिश्चंद्र तळेकर व ज्ञानेश्वर अरुण नवले दोघे राहणार रुई तालुका गेवराई, जिल्हा बीड यांनी शंकर बापूराव सुगडे यांच्यावर पोटात, छातीवर चाकूने 7 ते 8 वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने दोघांचे विरुद्ध तलवाडा पोलीस स्टेशन येथे दोन्ही आरोपींचे विरुद्ध भा.द.वी चे कलम 307,326,323,504, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद होऊन दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात जामीन मिळण्याकरिता सुग्रीव तळेकर व ज्ञानेश्वर तळेकर यांनी सत्र न्यायालय बीड येथे अर्ज दाखल केला होता.सदर अर्जास फिर्यादीचे वतीने प्रखर विरोध करण्यात आला.सदर अर्ज सुनावणी नंतर माननीय सत्र न्यायालयाने सुग्रीव तळेकर व ज्ञानेश्वर नवले यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला फिर्यादीच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केल्याने त्यांचा फिर्यादीस जीवे मारण्याचा हेतू असल्याचे सकृत दर्शनी स्पष्ट होत असलेचे सांगून आरोपीस जामीन मंजूर झालेस ते साक्षीदारांवर दबाव आणून पुरावा नष्ट करण्याची भीती असल्याने आरोपींना जामीन देऊ नये असा प्रखर युक्तिवाद केला.सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला सदर प्रकरणात फिर्यादीचे वतीने ॲड.पी.एस राजापूरकर, ॲड.डी.डी वाघमारे , ॲड. आर एस खुणे यांनी देखील बाजू मांडली.