
वीर (प्रतिनिधी) अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेऊन काका शरद पवार याची साथ सोडत सत्ताधारी भाजप – शिवसेना सामील झाल्याने काका पुतण्यात तणाव वाढला होता.भाजपला हवे हवे से वाटणारे अजित पवार यांचा लोकसभेत काहीच प्रभाव दिसला नाही.उलट अजित पवार यांना सोबत घेतल्याने मताधिक्य कमी झाल्याचे दिसत आहे.त्यामुळे आता भाजप ला अजित पवार नको झाले असून गेल्याच आठवड्यात मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यात आज दुपारी जिल्हा नियोजन समितीची बैठक असून शरद पवार यांना या बैठकीचे निमंत्रण असल्याने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.आज काका पुतणे अमाने सामने येणार असून अजित पवार पुन्हा शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.खरच पवार एकत्र येणार का?हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.