भंगार गोळा करणाऱ्या चोरट्याने ॲक्सिस बँक,पाण्याचे ATM फोडण्याचा प्रयत्न
शहरातील वाढत्या चोऱ्यासह,अफवा मध्ये जास्त वाढ

वीर(प्रतिनिधी)बीड शहरात चोराची चांगलीच दहशत झाली असून काही भागातील नागरिकांनी रात्रीचे जागरण सुरू केले आहे.शहरात चोरीच्या घटनापेक्षा अफवाच जास्त पसरवल्या जात असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून,पोलिसांनी रात्रीचे ग्रस्त वाढ करावी म्हणून काही नागरिकांनी पोलीस ठाणे प्रमुखांना निवेदन देखील दिले आहे.काल शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवघन कॉलेज समोरील पाण्याचे ATM फोडण्याचा प्रयत्न एक भंगार गोळा करणाऱ्या कडून करण्यात आला.त्याला ते पाण्याचे बॉक्स चे लॉक न तुटल्याने त्यातील पैसे वाचले.शिवाजी नगर पोलिस पोट्रलिंग करत असताना त्यांच्या ह भंगार गोळा करणाऱ्यानेच ॲक्सिस बँकेचे एटीएम दगडाने फोडण्याचा प्रयत्न केला होता.त्याला रंगेहाथ पकडल्याने पुढील अनर्थ टाळला असून ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे शिवाजी नगर पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अमंलदार सुनील बांगर,लिंबाजी महानोर,बप्पा सारनीकर, अस्तित लादे ,सचिन आगलावे,पोलीस हवालदार फिरोज पठाण यांनी ही करावी करत अक्षय दिलीप गायकवाड रा.पेडगाव याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.