
वीर(प्रतिनिधी)बीड शहरातील बार्शी रोडवरील किनारा हॉटेल च्या बाजूला दिनांक 15 जुलै रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राम साळवे हे उभे असताना ओळखीचे असलेले किशोर शहाने व देवीसिंह शिंदे यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने राम साळवे यांनी पैसे देण्यास नकार दिला असता मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.यावेळी तिथे उपस्थित असलेल्यानी मारहाण करताना साळवे यांनी कसे बसे सोडवल्या नंतर किशोर शहाणे यांनी स्वतःजवळ चाकू काढत जिवे मारण्याच्या उद्देशाने राम साळवे च्या गळ्यावर, हातावर ,पायावर चाकूने वार करण्यात आले.साळवे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न व जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी 1)किशोर शहाणे रा. गणेश नगर, बीड2) देवीसिंह शिंदे रा.हत्तिखाणा बीड यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भा.न्या.स.क.109,115(2),352, 3(1)(r),3(2)(va) कलमांतर्गत गुन्हा नोंद असून पुढील तपास शिवा नगर पोलीस ठाण्याचे पोलिस करत आहेत.