ताज्या घडामोडी

मॅनेजर ने व्यापाऱ्याला घातला 1 कोटीचा गंडा.

परळीत मॅनेजर व पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल.

वीर(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील परळी शहरातील सुशील वाल्मिक कराड रा.परळी या व्यापाऱ्याकडे कोल्ड्रिंक्स, खाद्यतेल,आईस्क्रीम ची एजन्सी असून हा माल कंपनीकडून खरेदी करून व्यापाऱ्यासह दुकानदारांना वितरित करण्याची सान्वि व अन्वी या नावे एजन्सी कराड यांच्याकडे आहे.या एजन्सी मध्ये सिद्धराम अमृत कोळी रा.सोलापूर हा मॅनेजर कोल्ड्रिंक,खाद्यतेल,आईस्क्रीम या मालाची वितरण झाल्यावर पैसे जमा व व्यवहार कोळी हा पाहत होता.कराड यांनी एजन्सीचा हिशोब पाहिला असता दुकानदार व व्यापाऱ्याकडून पैसे जमा करून सिद्धाराम कोळी यांना स्वतःच्या व पत्नी संगीता कोळी याच्या नावे आराध्या ट्रान्सपोर्ट बँक खात्यात स्वतःच्या फायद्यासाठी 1 कोटी 8 लाख 37 हजाराचा अपहार केल्याने पती-पत्नी सिद्धराम कोळी व संगीता कोळी यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक राजकुमार ससाने करत आहेत.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button